हेल्दी फूड कितपत हेल्दी


सध्या सगळेच लोक चुकीच्या राहणीमानामुळे जाड होत आहेत आणि जाडी वाढल्यानंतर ती कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हणूनच वजन कमी करणारी औषधे आणि निरनिराळ्या प्रकारचे उपाय यांच्यावर अब्जावधी रुपये खर्च होताना दिसत आहेत. या सगळ्या उपद्व्यापामध्ये वजन कमी करणारी अन्नद्रव्ये आणि आरोग्यास उत्तम अन्नपदार्थ अशा नावाने काही अन्नपदार्थ लोकांच्या गळी मारले जात आहेत. एका बाजूला वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच वजन घटवण्याचा वायदा करून बुवाबाजी करणार्‍या कथित क्लबांच्या विरोधात जनजागृती करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. काही डॉक्टरांनी याच उद्देशाने हेल्दी फूडच्या संबंधातील लोकांचे भ्रम दूर करायला सुरूवात केली आहे.

तथाकथित हेल्दी फूड म्हणून ज्यांचा गौरव केला जातो तेच फूड कसे अनहेल्दी आहे हे या डॉक्टरांनी दाखवून दिलेले आहे. गोड पदार्थ खाल्ल्याने जाडी वाढते हे सर्वांना माहीत आहे. परंतु काही लोकांना गोड खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणून अशा लोकांसाठी कृत्रिम स्वीटनर्स वापरून काही अन्नपदार्थ गोड केले जात आहेत. हे आर्टिफिशियल स्वीटनर्स हे अनैसर्गिक रसायनांपासून तयार केलेले असतात आणि ती रसायने पचन करणे आपल्याला अवघड जाते. ही रसायनेच शरीरामध्ये चरबीचे स्वरूप धारण करून साठून राहतात आणि उलट आपली जाडी वाढवतात. सोया मिल्क हे असेच एक उत्पादन आहे. ते सुध्दा वरील रसायनांइतकेच धोकादायक समजले जाते. प्रत्यक्षात त्याच्या संबंधातले हे तथ्य विसरून जाऊन लोक सडपातळ होण्यासाठी सोया मिल्कचे प्राशन करायला लागतात. वस्तुतः सोया मिल्क तयार करताना जी रसायने वापरली जातात. ती शरीराला घातक असतात.

बाजारात फळांचे रस तयार स्वरूपात बाटल्यांमध्ये मिळतात. त्यांच्यामध्ये वापरलेली प्रिझर्व्हेटिव्ज् हे रसायनांपासून बनवलेले असतात. त्यांच्यामुळे फळांचा रस प्रिझर्व्ह केला जातो. परंतु ती रसायने आपल्या शरीराला घातक असतात. अशा रसांमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते आणि ते आपल्याला घातक ठरू शकते. ब्रेड हा मैद्यापासून केलेला असतो आणि जाडी वाढवण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून सध्या मैद्याच्या ऐवजी व्होलव्हीट ब्रेड खाण्याकडे लोकांचा कल आहे हा ब्रेड खाल्ल्याने जाडी वाढणार नाही असे त्यांना वाटते पण प्रत्यक्षात व्होलव्हीट ब्रेडसुध्दा जाडी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment