बहुपयोगी व्हिनेगर ..


व्हाईट किंवा distilled व्हिनेगर हा प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात सापडणारा पदार्थ आहे. खासकरून चायनीज पदार्थांमध्ये, सलाड्स मध्ये किंवा काही प्रकारच्या लोणच्यांमध्ये व्हिनेगर चा वापर होतो. malt, कॉर्न आणि इथनोलचे मिश्रण यीस्टच्या मदतीने फेर्मेंट केले जाते. हे मिश्रण डायल्युट करून ५ ते ८ % acetic acid असलेले द्रव तयार केले जाते, ते म्हणजे व्हिनेगर. स्वयंपाकासाठी किंवा preservative म्हणून व्हीनेगेरचा वापर केला जातो, पण त्याशिवाय व्हिनेगर चे अनेक गृहोपयोगी फायदे आहेत. त्याबद्दल थोडेसे..

सततच्या वापरामुळे कात्री चे पाते चिकटसर होत राहते. अश्या वेळी एका मऊ कपड्यावर व्हिनेगर घेऊन कात्रीचे पाते पुसून काढावे. व्हिनेगर मुळे कात्रीच्या पात्याचा चिकटपणा साफ होऊन पाते पुन्हा नव्यासारखे चमकदार होईल. अनेकदा स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या नव्या वस्तूवर असलेले स्टीकर सहजी निघत नाहीत, किंवा स्टीकर निघाले तरी त्याचा चिकटपणा जात नाही. अश्यावेळी थोडे व्हिनेगर घालून स्टीकर ओलसर करावा. थोड्याच वेळात स्टीकर तर सहज निघून जाईलच, त्याशिवाय स्टीकरचा चिकटपणा ही साफ होईल.

कॉफी मेकर, dishwasher चा वापर करत असल्यास महिन्यातून एकदा व्हिनेगर वापरून या उपकरणांची सफाई करावी. कॉफी मेकर मध्ये कॉफी साठी पाणी भरण्याच्या कंटेनर मध्ये व्हिनेगर घालून कॉफी मेकर चालू करावा. व्हिनेगर उकळून (brew) जेव्हा कप मध्ये येईल तेव्हा ते ओतून द्यावे. सगळे व्हिनेगर उकळून कॉफी मेकर मधून निघून गेल्यानंतर कंटेनर सध्या पाण्याने अर्धा भरून ते उकळावे. सगळे पाणी उकळून कॉफी मेकर मधून brew करून काढून टाकावे. व्हिनेगरच्या वापरामुळे कॉफी मेकरच्या आतमध्ये साठलेले कॉफीचे अंश साफ होऊन कॉफी मेकर पूर्णपणे साफ होईल. तसेच, dishwasher मध्ये लिक्विड सोप घातला जातो त्या कंपार्टमेंट मध्ये व्हिनेगर घालून dishwasher चालवावा. व्हिनेगरच्या वापरामुळे dishwasher मध्ये साठलेले खाऱ्या पाण्याचे अंश साफ व्हायला मदत होते. तसेच dishwasher मध्ये येणारी दुर्गंधीही निघून जाते. माइक्रोवेव्ह ओव्हन च्या सफाई साठी व्हिनेगर अतिशय प्रभावी माध्यम आहे. एका माइक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून माइक्रोवेव्ह मध्ये चार मिनिटे गरम होऊ देऊन, त्यानंतर ओव्हन बंद करून ते मिश्रण तसेच दोन मिनिटे ठेवावे. त्यानंतर ते भांडे बाहेर काढून घेऊन मऊ सुती कपड्याने ओव्हन आतून पुसून घ्यावा. व्हिनेगर-पाणी मिश्रण गरम झाल्यावर बनलेल्या वाफेमुळे ओव्हनच्या आत सांडलेले अन्नाचे कण सुटून येऊन ओव्हन साफ आणि deodorize होण्यास मदत होते.

स्वयंपाक करत असताना किती तरी वेळा लसूण अगर कांद्याचा उग्र वास आपल्या हातातून जात नाही. किंवा बीट सोलल्यानंतर अगर चिरल्यानंतर त्याचा लाल रंग हाताला लागतो आणि सहज निघत नाही. अश्या वेळी साबणाने हात साफ धुऊन त्यानंतर थोडेसे व्हिनेगर हाताला चोळावे. त्यानंतर परत हात धुतल्यास हातला येणारे उग्र वास किंवा लागलेले रंग सहज साफ होतात.

स्टील किंवा क्रोम फिनिश असलेली विद्युत उपकरणे किंवा घरातील इतर वस्तू ( उदा. बाथरूम मधील फिटिंग्ज ) व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण वापरून चमकवता येतात. त्याचबरोबर कटलरीवर ( काटे, चमचे, बटरनाईफ, स्टेक नाईफ ) पाण्याचे डाग राहिले असता व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण स्प्रे करून सुती कपड्याने पुसून काढावे. कटलरी नव्याप्रमाणे चमकदार होईल. काचेच्या ग्लासेस ची सफाई सुद्धा याचप्रकारे करता येते.

घरातील साफसफाई करता व्हीनेगर वापरत असताना stone सर्फेसेस ( मार्बल, ग्रेनाईट इ.) वर व्हिनेगर वापरू नये. व्हिनेगर मधील acid मुळे stone सर्फेस ची चमक कमी होऊ शकते.

Leave a Comment