फळे खा पण सालीसकट


ताजी आणि हंगामी फळे आरोग्यास उत्तम असतात हे काही सांगण्याची गरज नाही. ते सर्वांना माहीत आहे. परंतु अशी फळे खाण्याची योग्य पध्दत सर्वांना माहीत असेलच असे नाही. साधारणतः फळे खाणारे लोक फळाची साल सोडून ती फेकून देऊन फक्त फळाचा आतला गर खातात. अशा प्रकारे साली फेकून दिल्यामुळे फळांचा योग्य फायदा होत नाही. म्हणून फळांच्या सालीसुध्दा किती महत्त्वाच्या असतात हे समजून घेतले पाहिजे. सफरचंद खाण्याने आरोग्याची प्राप्ती होते. परंतु सफरचंदाचे म्हणून जे फायदे असतात ते प्रामुख्याने त्याच्या सालीत असतात. सफरचंदाची साल कर्करोग विरोधी असते. त्यामुळे सफरचंद खातान ते सालीसह खाल्ले पाहिजे. अल्झायमर्स या आजारावर सफरचंदाची साल हे औषध ठरू शकते.

सफरचंदातील फायबर आणि जीवनसत्त्वे आरोग्याला उपकारक ठरतात आणि ट्रायटर्पेनॉईडस् हे द्रव्यही कर्करोग विरोधी असते. परंतु सफरचंदाचे हे गुण त्याच्या सालीमध्ये सामावलेले असतात. तेव्हा आपण साल फेकून सफरचंद खाल्ले तर या द्रव्याच्या फायद्यापासून वंचित राहतो. चिकूमध्ये असणारे व्हिटॅमिन्स म्हणजे चिकूच्या सालीत असणारे व्हिटॅमिन्स. त्याच्या सालीत असलेली ही जीवनसत्त्वे आपल्या पचनशक्तीला ताकद प्रदान करतात. चिकूची ही साल पोटॅशियम, आयर्न, फोलेट आणि पँटोथेनिक ऍसिड या द्रव्यांनी भरपूरयुक्त असते. तेव्हा चिकू खाताना सालीसह खाल्ला पाहिजे.

आलूबुखार हे एक फळ आरोग्यास उत्तम समजले जाते. हे फळ क जीवनसत्त्व पुरवणारे असते आणि त्या क जीवनसत्त्वामुळे मलावरोध तसेच पचनशक्तीचे अन्य विकार दुरूस्त होतात. मात्र आरोग्याला उपकारक ठरणारे हे सारे घटक आलूबुखारच्या सालीमध्ये असतात. आंब्याची सालसुध्दा औषधी असते. आपण कच्चा कैर्‍या सालीसहीत खातो आणि काही विशिष्ट आंबे पिकल्यानंतरही सालीसह खाल्ली जातात. मात्र बाकीचे सगळे आंबे साल काढून फेकून फक्त रसाच्या स्वरूपात खाल्ले जातात. मात्र आंब्याच्या सालीमध्ये शरीरातील चरबी कमी करण्याचा गुणधर्म आहे. ही साल कार्टोनॉईडस्, पॉलिफेनॉल्स, ओमेगा ३, ओमेगा ६ आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् बाळगून असते. त्यामुळे आंबा सालीसह खाल्ला तर या सगळ्या द्रव्यांचे फायदे शरीराला मिळतात. तेव्हा शक्यतो आंबा खाण्यापेक्षा आंब्याचे लोणचे खावे. ते अधिक गुणकारी ठरते. कारण लोणचे सालीसह घातलेले असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment