पुरुषांनो सावध रहा…


लहान मोठ्या वैद्यकीय समस्यांच्या बाबतीत सावध राहून ताबडतोब सल्ला घेण्याच्या बाबतीत महिला अधिक तत्पर असतात असे आढळले आहे. पुरुष मात्र ताबडतोबीने डॉक्टरांची भेट घेणे टाळत असतात. लहान मोठ्या वैद्यकीय समस्या निर्माण झाल्या तर डॉक्टराकडे जाण्याची गरज नाही असा विचार पुरुष करतात आणि काही वेळा त्यांच्या त्या समस्या आपोआपच सुटूनही जातात. मात्र काही डॉक्टरांचा असा सल्ला आहे की पुढील वैद्यकीय समस्या निर्माण झाल्या की त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पुरुषांचे वजन वाढले किंवा ते अधिक बीयर प्यायला लागले की त्यांचे स्तन ढिले व्हायला लागतात. अनेक पुरुषांचे स्तन स्त्रियांसारखेसुध्दा दिसायला लागतात.

तेव्हा असे काही लक्षण दिसायला लागले की ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कारण त्यातून यकृताचे विकार उद्भवण्याची शक्यता असते आणि एकदा यकृताची समस्या उद्भवली की त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन संपून जाते. काही वेळा वृध्द व्यक्तींमध्ये स्तनांची ही समस्या त्यांच्या अंडकोषातल्या दोषांचेही सूचन करत असते. पुरुषांना एकापेक्षा अधिकवेळा लघवीला जाणे लागणे हे मधूमेहाचे लक्षण आहे असे सर्वसाधारण मानले जाते. परंतु अधिकवेळा लघवीला जावे लागणे आणि त्यातल्या त्यात लघवी न आवरणे हे त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथीतील दोषांचे द्योतक असते. तेव्हा लघवीच्या या समस्या उद्भवल्या की डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. काही वेळा ते प्रोस्टेटच्या कर्करोगाचे लक्ष असू शकते.

काही लोकांचे वृषण आकाराने वाढते. त्यांची कार्यपध्दती आहे तशी सुरू राहते मात्र त्यांचा आकार अनावश्यकपणे वाढत जातो आणि तो जास्तच वाढला की वृषणांचे काम थांबायला लागते. त्याला वैद्यकीय शास्त्रात यानोस्मिया असे म्हटले जाते. या स्थितीचा परिणाम त्यांच्या कामजीवनावरही होऊ शकतो. टक्कल पडणे हे आपण स्वाभाविक समजतो परंतु टक्कलसुध्दा प्रोस्टेट ग्रंथीतल्या ट्यूमरचा परिणामसुध्दा असतो. एकदम समोरचे केस कमी होणे किंवा डोक्याच्या चक्रावरचे केस कमी होणे ही माणसातल्या कामग्रंथीच्या कार्यक्षमतेचा व्यय होत असल्याचे लक्षण मानले जाते. तेव्हा ही साधारण निरुपद्रवी वाटणारी लक्षणे जाणवायला लागली की आवर्जुन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment