व्हॉट्सअॅपमध्ये येणार आहे मेसेज एडिट फीचर, असे करेल काम


ट्विटरच्या एडिट बटणाची प्रतीक्षा खूप दिवसांपासून सुरू आहे आणि ही प्रतीक्षा आता आणखी लांबणार आहे, पण व्हॉट्सअॅपने ते गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप एडिट बटणावर काम करत आहे. व्हॉट्सअॅपच्या एडिट बटणाची बीटा व्हर्जनवर चाचणी केली जात आहे, त्यानंतर यूजर्स एखादा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवूनही आरामात एडिट करू शकतील.

व्हॉट्सअॅप मेसेज एडिटिंग फीचरचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे. Wabetainfo ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, WhatsApp गेल्या पाच वर्षांपासून एडिट फीचरवर काम करत आहे आणि आता त्याची चाचणी सुरू झाली आहे. नवीन फीचरची सध्या अँड्रॉइडवर चाचणी सुरू आहे आणि लवकरच iOS आणि डेस्कटॉप व्हर्जनवर त्याची चाचणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप आणखी एका मोठ्या फीचरवर काम करत आहे. नवीन अपडेटनंतर तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्यास अॅडमिनशिवाय कोणालाही काही कळणार नाही. व्हॉट्सअॅपच्या फीचरचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन फीचर सध्या बीटा चाचणीत आहे. नवीन फीचर आणल्यानंतर ग्रुप अॅडमिनलाच ग्रुप सोडण्याची सूचना मिळेल.

याशिवाय व्हॉट्सअॅप एका नवीन अपडेटवरही काम करत आहे, ज्यानंतर 512 लोकांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडता येईल. नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 512 लोकांना ग्रुपमध्ये अॅड करण्याचा पर्याय मिळत असल्याचे दिसून येते. नवीन फीचरची चाचणी iOS च्या बीटा आवृत्तीवर केली जात आहे. नवीन फीचर शाळा, महाविद्यालये, कोणतीही संस्था आणि लहान व्यवसायांसाठी खूप उपयुक्त ठरेल. सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच जोडता येते.