Varsha Priyadarshini: फोटोंमध्ये पहा कोण आहे अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी, जिच्या खासदार पतीने तिच्यावर केला आहे आठ वर्षांपासून सेक्स न केल्याचा आरोप


प्रसिद्ध ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि तिचा खासदार पती अनुभव मोहंती सध्या खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर युजर्स दोघांबद्दल भरभरून कमेंट करत आहेत. अनुभव मोहंती यांचे प्रकरण, ज्यात त्यांनी आपल्या अभिनेत्री पत्नीवर आठ वर्षांपासून सेक्स न केल्याचा आरोप केला आहे. जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण काय आहे? कोण आहेत अनुभव मोहंती आणि अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी? काय आहे या दोघांची प्रेमकहाणी?

पहिले जाणून घेऊ या अनुभव
अनुभव मोहंती यांच्या कारकिर्दीला अभिनेता, चित्रपट निर्माता म्हणूनही सुरुवात झाली. 40 वर्षांच्या अनुभवाचा जन्म 24 डिसेंबर 1981 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. अनुभव हे ओडिशातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल (BJD) चे लोकसभा खासदार आहेत. 2014 मध्ये त्यांना बीजेडीने पहिल्यांदा राज्यसभेवर पाठवले होते. अनुभवने 2014 मध्ये ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीशी लग्न केले.

कोण आहे वर्षा प्रियदर्शिनी?
ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीचा जन्म 7 ऑगस्ट 1984 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. 37 वर्षीय वर्षाने बंगाली चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. तिने नऊ बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आणि 2003 पासून ती ओडिया चित्रपटांकडे वळली. वर्षाने आतापर्यंत 30 हून अधिक ओडिया चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चित्रपटाच्या सेटवर भेट
एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वर्षा आणि अनुभव यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू दोघेही एकमेकांना डेट करू लागले. जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले.

काय केले आरोप?
अनुभव मोहंती आणि वर्षा यांच्यात घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. खासदार अनुभव मोहंती यांनी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली, पण इतकी वर्षे झाली तरी पत्नी वर्षा हिने संबंध ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मी मानसिक तणावातून जात आहे. अजून किती दिवस कोणी वाट पहावी, मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे, पण प्रकरण आता कोर्टात आहे.

दोन वर्षांत आल्या फूट पडल्याच्या बातम्या
अनुभव मोहंती आणि वर्षा यांचे 2014 मध्ये लग्न झाले होते. दोन वर्षांतच दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. 2016 मध्ये पहिल्यांदा अनुभव मोहंती यांनी पत्नीविरोधात याचिका दाखल केली होती की, आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत, पण पत्नी प्रियदर्शिनी सेक्स करू देत नाही.

2020 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला
अनुभव मोहंती यांनी 2020 मध्ये पत्नी प्रियदर्शिनीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर वर्षा यांनी मोहंती यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोपही केला.

आता काय आहे कोर्टाचा निर्णय?
घटस्फोटाच्या प्रकरणाशिवाय अनुभव मोहंती यांनी वर्षाविरोधात न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, वर्षा यांनी त्यांचे वडिलोपार्जित घर सोडले, तर मी त्यांच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करण्यास तयार आहे. याशिवाय दुसऱ्या याचिकेत त्यांनी वर्षा यांच्या उत्पन्नाचे स्रोतही उघड करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.

या याचिकेवर सुनावणी करताना कटकच्या एडीजेएम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने वर्षा प्रियदर्शिनी यांना अनुभव मोहंती यांचे वडिलोपार्जित निवासस्थान दोन महिन्यांत रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अनुभव मोहंती यांना वर्षाला जगण्यासाठी दरमहा 30 हजार रुपये देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.