Train Derails in China : चीनमध्ये रुळावरून घसरली बुलेट ट्रेन, चालकाचा मृत्यू, सात प्रवासी गंभीर जखमी


बीजिंग – दक्षिण-पश्चिम चीनच्या गुइझोउ प्रांतात शनिवारी एक वेगवान ट्रेन रुळावरून घसरली आणि चालकाचा मृत्यू झाला, तसेच किमान सात प्रवासी जखमी झाले. चीनच्या नैऋत्य गुईयांग प्रांतातून दक्षिणेकडील ग्वांगझू प्रांतात जाणारी बुलेट ट्रेन D2809 त्यावेळी रोंगजियांग स्टेशनवर अचानक भूस्खलनामुळे रुळावरून घसरली. ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रानुसार, युएझाई बोगद्याच्या प्रवेशद्वारावर ट्रेनचा सातवा आणि आठवा डबा रुळावरून घसरला. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. सर्व जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून अन्य 136 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.

याआधीही रुळावरून घसरली होती ट्रेन
याआधी मध्य चीनमधील हुनान प्रांतात एक ट्रेन रुळावरून घसरली होती. त्या घटनेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर चार जण गंभीर जखमी झाले असून 123 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण संततधार पाऊस आणि भूस्खलन होते.

चीनने केली होती बुलेट ट्रेनचा वेग ताशी 350 किमी करण्याची घोषणा
चीन सरकारने यापूर्वी जूनमध्ये बीजिंगला दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांताशी जोडणाऱ्या हाय-स्पीड रेल्वेचा ऑपरेटिंग स्पीड 350 किलोमीटर प्रति तास करण्याची घोषणा केली होती.