नवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी ट्विट केले की, मला कोविडची लागण झाली आहे. माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना प्रोटोकॉलनुसार मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे.
आता प्रियंका गांधींही कोरोनाबाधित, एक दिवसापूर्वी झाली होती सोनिया गांधींना लागण
लखनौचा दौरा आटोपून प्रियांका गांधी बुधवारी दिल्लीत परतल्या. त्यांनी आई सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. प्रियांका यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी सोनिया गांधींना संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. काँग्रेस अध्यक्षांनी यापूर्वी ज्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यापैकी अनेकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले होते. सोनिया गांधी यांना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता. त्यानंतर केलेल्या कोविड चाचणीत त्या पॉझिटिव्ह आढळल्या.