नवी दिल्ली : महागाई नियंत्रणासाठी आरबीआयच्या प्रयत्नांचा परिणाम डाळी आणि तेलावर दिसून येत आहे. पण टोमॅटो आणि बटाट्याच्या वाढत्या किमती परिस्थिती बिघडवू शकतात. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात टोमॅटो 31.64 रुपये प्रति किलोवरून 52.32 रुपये किलो झाला आहे. त्यात 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बटाट्याचा भाव 20.93 रुपयांवरून 24.12 रुपये किलो झाला आहे. त्यात 17 टक्के वाढ झाली आहे.
महागाईचा फटका : आरबीआय रेपो दरात करणार आणखी वाढ, महिन्यात तेल आणि डाळी स्वस्त, तर टोमॅटो-बटाटा महाग
आरबीआयने 4 मे रोजी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती आणि 8 जून रोजीही ते दर वाढवतील अशी अपेक्षा आहे. दक्षिण भारतात टोमॅटोचे भाव दोन आठवड्यांत स्थिर होतील, असे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले आहे. देशाच्या काही भागात टोमॅटो 50 ते 100 रुपये किलोने विकला जात आहे. ते म्हणाले की, दिल्लीत टोमॅटोचे भाव स्थिर असून ज्या भागात त्याचे भाव वाढले आहेत, तेथील पिकांना पावसाचा फटका बसला आहे.
- वाढले गहू आणि पिठाचे भाव
13 मे रोजी सरकारने निर्यातीवर बंदी घालून गव्हाच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अजूनही महागच होत आहे. एका महिन्यात 28.75 रुपयांवरून 29.57 रुपयांवर पोहोचला.
- पिठाचा भाव 29.29 रुपयांवरून 33.44 रुपये किलो झाला आहे. मूग डाळ 102.27 ते 102.8 रुपये किलो, तर मसूर डाळ 96.40 रुपयांवरून 96.83 रुपयांवर पोहोचली आहे.
पामतेल, मोहरी तेलाचे भाव घसरले
- ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात पाम तेलाच्या किमती 157.69 रुपयांवरून 155.94 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. मोहरीच्या तेलाचा भाव 184.95 रुपयांवरून 183.96 रुपयांवर आला आहे.
- चहाच्या पावडरचा भाव 286.97 रुपयांवरून 284.21 रुपयांवर तर कांद्याचा भाव 24.16 रुपयांवरून 23.81 रुपयांवर आला आहे. मीठ 19.48 रुपयांवरून 19.49 रुपयांवर पोहोचले आहे.