कोणत्याही परिस्थितीत केरळमध्ये लागू होणार नाही CAA – विजयन


तिरुवनंतपुरम – केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात CAAलागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारवर आरोप करत ते म्हणाले, देशातील धर्मनिरपेक्षता संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सीएएबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि ती कायम राहील.

वास्तविक, केरळचे मुख्यमंत्री विजयन सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. ते म्हणाले, आपला देश धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर काम करतो, असे भारतीय राज्यघटनेत स्पष्ट लिहिले असून ते संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे सीएम विजयन यांची ही टिप्पणी अशावेळी आली आहे, जेव्हा नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, कोरोना महामारी संपल्यानंतर संपूर्ण देशात CAA लागू केला जाईल.

धर्माच्या आधारावर होणार नाही नागरिकत्वाचा निर्णय
सीएम विजयन म्हणाले, एका विशिष्ट गटाला सीएएची जास्त काळजी आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एक गट धर्माच्या आधारे नागरिकत्वाचा निर्णय घेत होता. आमच्या सरकारने याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर नागरिकत्वाचा निर्णय घेतला जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.