नवी दिल्ली – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही मोठे बदल पाहायला मिळतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. हे बदल एकतर ओझे वाढवतात किंवा थोडा आराम देतात. तर आजपासून जून महिना सुरू होत असून पहिल्याच दिवशी गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करून मोठा दिलासा दिला आहे.
जूनच्या पहिल्या दिवशी दिलासादायक बातमी, 135 रुपयांनी स्वस्त झाला गॅस सिलिंडर
कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 135 रुपयांनी कपात केली आहे. या बदलानंतर दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत आता 2219 रुपये, कोलकात्यात 2322 रुपये, मुंबईत 2171.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2373 रुपये असेल. तथापि, कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, म्हणजेच ते कायम राहतील. नवीन दर आज 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत.