भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर 50 कोटींच्या फसवणूकी प्रकरणी गुन्हा दाखल


मुंबई – महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय युद्ध आणि ईडीची कारवाई यामध्ये आता मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने उडी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात 52 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (IOB) व्यवस्थापकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, कंबोज हे कंपनीच्या तीन संचालकांपैकी एक आहेत, ज्यांनी 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ते निर्धारित उद्देशाव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरले. EOW ने कंबोज आणि इतर दोन संचालकांविरुद्ध भादंवि कलम 409 आणि 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.