मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी येथे त्यांच्या हिपवर शस्त्रक्रिया होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया
मनसेच्या एका नेत्याने ही माहिती दिली. या महिन्याच्या सुरुवातीला, 52 वर्षीय ठाकरे यांनी सांगितले होते, की त्यांच्या गुडघे आणि पाठीच्या समस्यांसाठी त्यांची शस्त्रक्रिया केली जाईल. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आज सांगितले की, ठाकरे यांच्या हिपवर शस्त्रक्रिया होणार आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आहेत. नुकतेच राज ठाकरे महाराष्ट्रातील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देऊन चर्चेत आले होते. त्याचबरोबर ते 5 जूनला अयोध्येलाही जाणार होते, पण नंतर त्यांनी आपली योजना पुढे ढकलली.