आयपीएल संपली, पुढच्या मिशनसाठी सज्ज टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका टीम 2 जूनला होणार भारतात दाखल


नवी दिल्ली – नुकतीच इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाची सांगता झाली. भारतीय संघ आता पुढच्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. 9 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी पाहुणा संघ चार दिवस अगोदर भारतात पोहोचेल, तर टीम इंडियाचे सर्व खेळाडू 2 जूनला दिल्लीला पोहोचतील. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतच होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 ते 19 जून दरम्यान पाच सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या पाच सामन्यांच्या यजमानपदासाठी दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरूची निवड करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीत होणार आहे. दुसरा टी-20 सामना 12 जूनला कटकमध्ये तर तिसरा सामना 14 जूनला विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. चौथा T20 सामना 17 जून रोजी राजकोटमध्ये तर शेवटचा सामना 19 जून रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे.

केएल राहुल असेल कर्णधार
केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णो , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

दक्षिण आफ्रिका संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, हेन्री क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुम्बी एनगिडी, अॅनरिक नॉर्खिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शम्सी, ट्रिस्टियन डी व्हॅनर, ट्रिस्टियन डी व्हॅनर रस्सी मार्को यांसें