अल्लू अर्जुन-प्रभासला टक्कर देणार बॉलीवूडचा भाईजान


साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. ‘पुष्पा: द राइज’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 2’च्या यशानंतर साऊथ चित्रपटांबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच ‘पुष्पा 2’चे निर्माते या चित्रपटाचा सिक्वेल आणखी चांगला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होणार होता, मात्र स्क्रिप्टमधील बदलांमुळे तो 2023 च्या उन्हाळ्यात रिलीज करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘पुष्पा: द रुल’चे अपडेट
‘KGF: Chapter 2’ च्या यशानंतर ‘पुष्पा: द रुल’चे निर्माते स्क्रिप्टचे पुनर्लेखन करत आहेत. सुकुमारने एसएस राजामौलीच्या ‘RRR’ आणि नीलच्या ‘KGF 2’ प्रमाणेच दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील प्रेक्षकांना प्रभावित करतील असे घटक चित्रपटात जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय निर्मात्यांनी चित्रपटाच्या संवादांमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील संवाद दीर्घकाळ लोकांच्या हृदयात घर करून राहतील.

दोन दाक्षिणात्य चित्रपटांची टक्कर
मात्र, आता ‘पुष्पा’च्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. निर्माते ‘RRR’ पेक्षा ‘पुष्पा 2’ हा अधिक प्रभावी चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा करत असताना, पुष्पाला टक्कर देण्यासाठी प्रभासचा चित्रपट ‘सालार’ 2023 च्या उन्हाळ्यात रिलीज होणार आहे. संपूर्ण तयारी झाली आहे. अलीकडेच, याविषयी माहिती देताना, चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितले की, आम्ही एप्रिल 2023 ते जून 2023 दरम्यान सालार रिलीज करू शकतो.

पुन्हा एकदा होणार बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड सामना
त्याच वेळी, वर्षातील तिसरा मोठा चित्रपट ‘टायगर 3’ देखील ‘पुष्पा-द रुल’ आणि ‘सालार’ या दोन्हींना टक्कर देण्यासाठी मे 2023 मध्ये रिलीज होणार आहे. सलमानचा चित्रपट नेहमीच चाहत्यांसाठी एक मेजवानी असतो, पण यावेळी इमरान हाश्मीचा समावेश आणि शाहरुख खानच्या कॅमिओमुळे हा चित्रपट मोठा हिट ठरू शकतो.