केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेच्या निकालात टॉप-3 मध्ये फक्त मुलींचा समावेश आहे. प्रथम क्रमांक- श्रुती शर्मा, द्वितीय क्रमांक- अंकिता अग्रवाल, तृतीय क्रमांक- गामिनी सिंगला, चतुर्थ क्रमांक- ऐश्वर्या वर्मा. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
UPSC Topper Shurti Sharma: चार वर्षांच्या मेहनतीने बनली UPSC टॉपर, वाचा श्रुती शर्माची यशोगाथा
श्रुती शर्मा ठरली टॉपर
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असलेल्या श्रुती शर्माने UPSC नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून कुटुंबाचे नाव उंचावले आहे. निकालावर प्रथमदर्शनी अभिप्राय देताना, श्रुती शर्मा तिच्या यशाचे श्रेय या प्रवासात तिच्यासोबत असलेल्या सर्वांना देते. तिने तिचे कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले आहेत, ज्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला.
जेएनयूमधून घेतले आहे श्रुतीने शिक्षण
श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीमध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली होती. हे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक असल्याचे तिने सांगितले.
आयएएस होण्याचे स्वप्न
श्रुती शर्माने सांगितले की, ती या निकालाने आश्चर्यचकित झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून ती सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती. श्रुती शर्माचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. तिला भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे आहे.
जामियामधून करत होती तयारी
उत्तर प्रदेशातील बिजनौरची रहिवासी असलेली श्रुती शर्मा जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शियल कोचिंग अकादमी (RCA) मधून तिच्या नागरी सेवांसाठी तयारी करत होती. RCA ला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक यांसारख्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि निवासी सुविधा पुरवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे निधी दिला जातो. जामियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कोचिंग अकादमीच्या 23 विद्यार्थ्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार या परीक्षेत एकूण 685 उमेदवारांची निवड झाली आहे. आयएएस, आयपीएस आणि आयएफएस पदांसाठी निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते.