विमानाचा रंग पांढराच का असतो?


लंडन: विमानाने प्रवास करताना आपण कधी विचार करत नाही की अधिकाधिक विमानाचा रंग नेहमी पांढरा का असतो. विमानाला रंग नसतो असे काही नाही. कलरफुल विमानांची संख्या खूप कमी आहे. अधिकाधिक विमानाचा रंग हा पांढराच दिसून येतो. यामागे काही कारणे आहेत.

विमानाला थंड ठेवण्यासाठी पांढर्‍या रंगाचा वापर करण्यात येतो. त्यामुळेच विमानाला इतर रंगांपेक्षा हा रंग लावल्यास कमी उकडते. जवळपास ३ लाखांपासून ते १ कोटीपर्यंत खर्च एका विमानाला रंग लावण्यासाठी येतो आणि कोणतीही कंपनी एका विमानाच्या रंगामागे एवढा खर्च करणे पसंत करत नाही. त्याचबरोबर ३ ते ४ आठवडे इतका कालावधी एका विमानाला रंग लावण्यासाठी लागतो. त्यामुळे कंपनीचे खूप नुकसान होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून सफेद रंगच ठेवला जातो.

दररोज विमान उन्हामध्ये उभे असल्यास त्याच्यावर लावलेले इतर रंग फिकट होतात. मात्र पांढर्‍या रंगासोबत अशी समस्या निर्माण होत नाही. त्यामुळेच जास्तीत-जास्त विमान कंपन्या विमानाला पांढरा रंगच ठेवणे पसंत करतात. तसेच विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे कंपनी विमान खरेदी करते आणि विकत असते. अशावेळी जर पांढरा रंग असेल, तर कंपनीचे नाव लवकर बदलता येते. कोणताही दुसरा रंग लावल्यास विमानाचे वजन वाढते. त्यामुळे पेट्रोल जास्त लागतो. पांढर्‍या रंगामुळे पेट्रोल कमी लागतो आणि कंपनीला विमान उडवणे परवडते. त्या सर्व कारणांमुळे विमानाचा रंग नेहमी पांढराच ठेवला जातो.

Leave a Comment