जर तुम्हाला कोणी म्हटले की, बीअर पोटात तयार होते. तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र हे खरे आहे. अमेरिकेतील एका 46 वर्षीय व्यक्तीच्या पोटात आपोआप बीअर तयार होते. 2014 मध्ये या व्यक्तीला दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे दंड भरावा लागला होता. मात्र त्यावेळी त्यांनी दारू पिली नव्हती.
अरे बापरे ! या व्यक्तीच्या पोटात आपोआप तयार होते बीअर
मात्र एखाद्या व्यक्तीच्या पोटात बीअर कशी काय तयार होऊ शकते ? याची तपासणी केल्यावर समजले की, त्यांना एक आजार आहे. या आजाराचे नाव Auto-Brewery Syndrome (ABS) असे आहे. यामुळे पोटात आपोआप बीअर तयार होते. या गोष्टीची माहिती त्यांना देखील 5 वर्षांनी समजली.
या व्यक्तीच्या शरीरात एक फंगस तयार होते. या फंगसचे नाव Saccharomyces Cerevisiae असे आहे. हे कार्बोहायड्रेटला अल्कोहॉलमध्ये बदलते. त्यामुळे पोटात आपोआप बीअर तयार होते.
अमेरिकेच्या न्युयॉर्कमधील रिकमाँड युनिवर्सिटी मेडिकल सेंटरचे स्पेशलिस्ट डॉक्टर्सनी या दुर्मिळ आजाराचा शोध लावला आहे. हा आजार एवढा दुर्मिळ आहे की, मागील 30 वर्षात केवळ 5 जणांना झाला आहे.
2011 मध्ये या व्यक्तीने आपल्या एका दुखापतीसाठी एंटीबायोटिक्स घेण्यास सुरूवात केली. या एंटीबायोटिक्समुळे या व्यक्तीला हा दुर्मिळ आजारा झाला. तपासणी केल्यावर ही व्यक्ती प्रत्येक वेळेस नशेतच असल्याचे दिसते. त्यांच्या कुटूंबाला, पोलिसांना कोणालाच त्यांच्यावर विश्वास नव्हता. अखेर 2017 मध्ये या आजाराचा तपास लागला.