आपण झोपेचे महत्त्व जाणतोच परंतु आपण कसे झोपतो यावर आपल्या आरोग्याशी संबंधित असणार्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. काही तज्ञांच्या मते उताणे झोपणे ही झोपेची सर्वात चांगली स्थिती आहे. मात्र आपण त्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या स्थितीत झोपलो की आपल्या चेहर्यावर त्याचे काही गंभीर परिणाम होतात. आयुर्वेदामध्ये कुशीवर झोपणे योग्य मानले जाते. आपण उजव्या कुशीवर झोपतो की डाव्या यावर आपली पचनशक्ती अवलंबून असते असे आयुर्वेदात मानले जाते. त्यातल्या त्यात डाव्या कुशीवर झोपणे हे पचनसंस्थेसाठी उपकारक असते असे परंपरेने आपण मानत आलो आहोत. म्हणूनच दुपारच्या जेवणानंतर जी छोटी झोप घेतली जाते तिला वामकुक्षी असे म्हणण्याचा प्रघात आहे. मात्र आता समोर आलेले संशोधन काही वेगळेच सांगत आहे.
झोपेचा आयुर्मर्यादेवर परिणाम
डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपणे, त्यातल्या त्यात पालथे झोपणे यामुळे चेहर्याच्या त्वचेवर विशेषतः छातीवर सुरकुत्या पडायला लागतात. मात्र सातत्याने आणि निर्धाराने उताणे झोपणार्या व्यक्तीची अशा सुरकुत्यांपासून सुटका होऊ शकते. उताणे झोपल्याने चेहर्याच्या त्वचेच्या आतील द्रव्ये चेहर्याच्या दिशेने पसरत नाहीत. या द्रव्यांचा परिणाम म्हणून सुरकुत्या पडत असतात. आपण डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपलो, पुन्हा कुशी बदलून पालथे झोपलो, कंटाळा आला म्हणून पुन्हा डाव्या कुशीवर झोपलो अशा प्रकारे बदल करत राहिलो तर चेहर्याच्या त्वचेच्या आतील द्रव्ये चेहर्याच्या विविध भागात पसरत राहतात आणि चेहरा झोपेतून उठल्यानंतर काही वेगळेच रूप धारण केलेला दिसतो.
आपले वय वाढत चालले की त्वचेची स्थिती स्थापकत्व शक्ती किंवा लवचिकपणा कमी होत जातो. अशा परिस्थितीत आपण त्वचेवर कोणतीही हालचाल सातत्याने करायला लागलो की तिचे परिणाम त्वचेवर जाणवायला लागतात. कुशी बदलण्याची सवय ही अशीच हालचाल मानली जाते. तिचे परिणाम त्वचेवर होतात. ते एवढे ठळक असतात की काही तज्ञांना एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघून तिची झोपण्याची सवय कशी असेल याचा अंदाज येतो. काही व्यक्तींच्या डाव्या गालावर जास्त सुरकुत्या असतात तर काहींच्या उजव्या. डाव्या गालावर सुरकुत्या असणारी व्यक्ती डाव्या कुशीवर झोपत असते. तर उजव्या गालावर सुरकुत्या असणारी व्यक्ती उजव्या कुशीवर झोपत असते.