पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लूकमध्ये दिसला रणदीप हुड्डा


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 139व्या जयंतीनिमित्त निर्मात्यांनी रणदीप हुड्डा यांचा चित्रपटातील फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये ‘हिंदू धर्म हा धर्म नसून तो इतिहास आहे’ असे लिहिले आहे. महेश मांजरेकर यांच्या आगामी बायोपिकमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा राजकारणी, कार्यकर्ता आणि लेखक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची शूटिंग या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होऊ शकते.


पोस्टर रिलीज करताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुडा याला सादर करत, वीर सावरकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! सावरकरांबद्दल लोकांचे विचार वेगळे असू शकतात. पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी तेच जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सावरकर प्रत्यक्षात काय होते, ते काय आहेत आणि काय असतील, या चित्रपटाच्या कथा आणि व्यक्तिरेखेमुळे काहीही फरक पडणार नाही. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.

आपला लूक लाँच करताना रणदीप हुड्डा यांनी लिहिले, भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-साक्षात्काराच्या लढ्यातील नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला आशा आहे की मी एका खऱ्या क्रांतिकारकाची भूमिका साकारू शकेन आणि ज्यांना एवढे दिवस गालिच्याखाली दाबून ठेवले गेल, त्यांची खरी कहाणी सांगू शकेन..तुम्हा सर्वांना वीर सावरकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!