शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट, एनसीबीने दाखल केले आरोपपत्र


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली. एनसीबीने 14 जणांविरुद्ध मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये आर्यन खानचे नाव नव्हते. आर्यन खान व्यतिरिक्त अवीन शाहू, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांच्याविरुद्ध पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

काय होतं संपूर्ण प्रकरण?
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणी, प्रचंड नाट्यमय घडामोडी आणि 26 दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबरला त्यांना जामीन मंजूर केला. त्याचवेळी, तब्बल 7 महिन्यांनंतर शाहरुख खानच्या मुलाला क्लीन चिट मिळाली आहे.

एनसीबी काय म्हणाले
एनसीबीच्या निवेदनानुसार, एसआयटीने केलेल्या तपासाच्या आधारे, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत 14 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, पुराव्याअभावी 6 जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही.

आर्यनने घेतले नाही ड्रग
एजन्सीने असेही म्हटले आहे की आर्यन खान, इश्मीत, अरबाज, विक्रांत आणि गोमित यांना आंतरराष्ट्रीय बंदर टर्मिनलवर पकडण्यात आले आणि 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर छापा टाकण्यात आला, तेव्हा नुपूर, मोहक आणि मुनमुम धमिचा यांना क्रूझमध्ये पकडण्यात आले. मात्र, आर्यन खान आणि मोहक वगळता सर्वजण या छाप्यादरम्यान ड्रग्जच्या प्रभावाखाली होते.