करीम नगर – तेलंगणा प्रदेश भाजपचे अध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, शिवलिंग शोधण्यासाठी तेलंगणातील प्रत्येक मशिदीचे उत्खनन केले जाईल. ‘रामराज्य’ आल्यावर उर्दूवर बंदी आणण्यात येईल.
प्रत्येक मशिदीचे उत्खनन करू, रामराज्य आल्यावर उर्दूवर घालू बंदी, तेलंगणा भाजप अध्यक्षांचे ओवेसींना आव्हान
बुधवारी करीम नगर येथील हिंदू एकता यात्रेत खासदार बंडी यांनीही देशात बॉम्बस्फोट होतात कारण मदरसे हे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र बनले आहेत, त्यांची ओळख पटवली पाहिजे. भाजप नेत्याने एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान देत म्हटले की, मशीद संकुल जेथे खोदले जाते, तेथे शिवलिंग सापडते. राज्यातील सर्व मशिदी आम्ही खोदून काढू. जर मृतदेह सापडले असतील तर तुम्ही (मुस्लिम) त्यावर दावा करता. शिवलिंग सापडले, तर मशीद आमच्या ताब्यात द्या. तुम्ही हे आव्हान स्वीकाराल का?
सत्तेत आल्यास अल्पसंख्याकांचे आरक्षण संपवू
बुधवारी आयोजित केलेल्या या यात्रेत खासदार बंडी म्हणाले की त्यांचा पक्ष तेलंगणात सत्तेवर आल्यास अल्पसंख्याकांचे आरक्षण संपवून त्यांना अनुसूचित जाती, जेजे आणि इतरांना आरक्षण देईल. लव्ह जिहाद आणि धर्मांतर संपवण्याचा संकल्पही त्यांनी केला. लव्ह जिहादच्या नावाखाली आमच्या बहिणींची फसवणूक होत असेल, तर आम्ही गप्प बसायचे का?, असा सवाल भाजप नेते बंडी संजय यांनी केला. हिंदू समाज गरिबांचे धर्मांतर सहन करणार नाही.
तत्पूर्वी हनुमान जयंतीनिमित्त करीम नगरमध्ये आयोजित हिंदू एकता यात्रेला संबोधित करताना बंडी म्हणाले होते की, जो कोणी लव्ह जिहादबद्दल बोलेल, तो लाठ्या खाईल. धर्मांतरावरही आम्ही कठोर कारवाई करू.
लवकरच प्रदर्शित होणार आहे ‘रझाकार फाईल्स’ चित्रपट
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा संदर्भ देत तेलंगणा प्रदेश भाजप अध्यक्ष म्हणाले की, हैदराबादमध्ये निजाम राजवटीत ‘रझाकारांनी’ हिंदू समाजावर केलेल्या अत्याचारांवर छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांचे डोळे उघडण्यासाठी ‘रझाकार फाइल्स’ हा चित्रपट लवकरच आणण्यात आला आहे.