ममता सरकारचा मोठा निर्णय, विद्यापीठांचे कुलगुरू आता राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील


कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. त्याचदरम्यान राज्य सरकारने मोठी घोषणा करून राज्यात संघर्षाचे नवे मैदान तयार केले आहे. ममता सरकारने निर्णय घेतला आहे की आता राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील.

ममता सरकारमधील मंत्री ब्रात्य बसू यांनी आज सांगितले की, आज आम्ही निर्णय घेतला आहे की राज्यांच्या सर्व विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील. यासंदर्भात विधानसभेत दुरुस्ती विधेयक आणले जाईल.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष
बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद नवीन नाही. दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तणाव आहे. केंद्राचे आदेश लादल्याचा आरोप ममता यांनी थेट राज्यपालांवर केला. त्याचवेळी राज्यपाल सांगतात की, ते जे काही काम करतात, ते संविधानानुसार होते. विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा विषय असो किंवा नवीन आमदाराला शपथ देण्याचा विषय असो, बंगालमध्ये जवळपास प्रत्येक विषयावर राजकीय वाद होतात. निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात संघर्षही झाला होता.