मंगळुरू – कर्नाटकातील मंगळुरू येथील प्रसिद्ध मलाली जुमा मशिदीच्या आसपासच्या परिसरात स्थानिक प्रशासनाने गुरुवारपर्यंत कलम 144 लागू केले आहे. 24 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 26 मे च्या सकाळपर्यंत परिसरातील मशिदीच्या 500 मीटर परिसरात हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.
मंगळुरूच्या मलाली मशीद परिसरात कलम 144 लागू, विहिंप-बजरंग दलाने केली पूजा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
जुमा मशीद परिसरात गर्दी जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळुरू प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. यासोबतच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मलाली येथील श्री रामांजनेय भजन मंदिरात विहिंप आणि बजरंग दलाने ‘तांबूल प्राशन’ केले. 21 एप्रिल रोजी मंगळुरूच्या बाहेरील जुन्या जुमा मशिदीमध्ये हिंदू मंदिरासारखी वास्तुशिल्प सापडली होती. मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिरासारखे पुरावे सापडल्याचे सांगण्यात आले आहे. हे नूतनीकरण मशीद कमिटीकडून करण्यात येत आहे.