बॉलिवूडचा डॅडी अर्थात प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा बॉलीवूडमधील उत्तम चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखला जातो. तो आपल्या चित्रपटातून नवीन कलाकारांना संधी देत असतो आणि त्यांना विशेष ओळख मिळवून देतो. शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणारा करण जोहर सोशल मीडियावरही खूप चर्चेत आहे. धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहर आपले आयुष्य अतिशय आलिशान आणि विलासी पद्धतीने जगतो. तो करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहेत. आजच्या काळात त्यांच्याकडे कशाचीही कमतरता नाही. आज करण जोहरचा ५० वा वाढदिवस आहे. चला तर मग या खास प्रसंगी जाणून घेऊया की एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या मालकाकडे किती मालमत्ता आहे.
करोडोंच्या घरापासून आलिशान कारपर्यंत, करण जोहरची एकूण संपत्ती जाणून तुम्ही देखील व्हाल अव्वाक!
एकूण मालमत्ता
बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा दिग्दर्शक करण जोहरची एकूण संपत्ती $200 दशलक्ष म्हणजेच सुमारे 1400 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, करण जोहर एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये घेतो. गेल्या काही वर्षांत करण जोहरच्या संपत्तीत जवळपास 80% वाढ झाली आहे. प्रसिद्ध निर्माता हा चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे.
आलिशान घर
करण जोहरने 2010 मध्ये मुंबईतील कार्टर रोडवर सी फेस डुप्लेक्स खरेदी केले होते. 8000 स्क्वेअर फूटच्या डुप्लेक्सची किंमत सुमारे 40,000 प्रति स्क्वेअर फूट होती. पण, जेव्हा त्याने हे घर घेतले तेव्हा त्याची किंमत सुमारे 32 कोटी रुपये होती. करणच्या या घराची बाल्कनी गौरी खानने डिझाईन केली आहे. याशिवाय मुंबईच्या मलबार हिल्समध्ये करण जोहरचे आणखी एक घर आहे, ज्याची किंमत सुमारे 20 कोटी आहे.
आलिशान गाड्या
चित्रपट निर्माता करण जोहरकडे अनेक आलिशान गाड्या आहेत, ज्यांची किंमत 8 कोटी रुपयांपर्यंत आहे. कार ब्रँड्समध्ये BMW 745, BMW 760, Mercedes S Class आणि Mercedes Maybach यांचा समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. याशिवाय त्याने सुमारे 480 कोटी रुपयांची वैयक्तिक गुंतवणूकही केली आहे.