IAS Pooja Singhal case: रांचीमध्ये सहा ठिकाणी ईडीचे छापे, बिहारपर्यंतही पोहोचला घोटाळा


रांची: निलंबित आयएएस पूजा सिंघल विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या पथकाने आज झारखंडची राजधानी रांचीमध्ये सहा ठिकाणी छापे टाकले. एवढेच नाही तर आता या घोटाळ्याची झळ बिहारमध्येही पोहोचली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ईडीने बिहारमधील मुझफ्फरपूरमध्येही छापेमारी केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. सिंघल (44) यांना या महिन्याच्या सुरुवातीला झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात ईडीने मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहार आणि इतर आर्थिक अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत अटक केली होती.

सोमवारी साहेबगंजच्या जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची करण्यात आली चौकशी
याआधी सोमवारी ईडीच्या टीमने साहेबगंजचे जिल्हा खनिकर्म अधिकारी विभूती कुमार यांची रांची येथील त्यांच्या सर्कल ऑफिसमध्ये चौकशी केली होती. ईडीच्या पथकाने विभूती कुमार यांना अनेकवेळा समन्स पाठवले होते, परंतु ते ईडीचे समन्स नाकारत होते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी कोणतेही समन्स आले नसल्याचे वक्तव्य ते प्रसारमाध्यमांमध्ये करत होते.