शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने घेतली 300 हून अधिक अंकांची उसळी, निफ्टीने पार केला 16300 चा टप्पा


मुंबई – आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 289 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी वाढून 54,615 वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 78 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांनी वाढून 16,344 पातळीवर उघडला. सध्या सेन्सेक्स 310 अंकांच्या आणि निफ्टी 88 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

बाजार उघडताच, सुमारे 1563 शेअर्स वाढले, 531 शेअर्स घसरले, तर 98 शेअर्स अपरिवर्तित राहिले. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराने गुंतवणूकदारांनी चांगलाच नफा कमावला. BSE सेन्सेक्स 1534 अंक किंवा 2.91 टक्क्यांच्या वाढीसह 54,326 वर बंद झाला, तर NSE निफ्टी निर्देशांक 457 अंक किंवा 2.89 टक्क्यांच्या वाढीसह 16,266 वर बंद झाला.