पारंपारिक मराठी लूकमध्ये सारा तेंडुलकर, आठ फोटोंमध्ये पाहा सचिनच्या फॅमिलीचा अंदाज


सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर 2022 मध्ये आयपीएलमुळे सतत चर्चेत असते. या मोसमात मुंबईच्या संघाने भलेही खराब प्रदर्शन केले असेल, तरी सारा बहुतेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती आणि ती तिच्या लूकमुळे चर्चेत होती. आता साराचा नवा लूक समोर आला आहे. यावेळी सारा तिच्या पारंपरिक स्टाईलमध्ये दिसली. तिने मराठी साडी नेसली आणि बिंदी आणि दागिने घालून पारंपारिक वेशभूषा केली. सचिनचे कुटुंबीय एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.

या लग्नात सारा तेंडुलकरनेही कलश घेऊन काही विधी केल्या. यावरून असा अंदाज लावता येतो की हे लग्न त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एकाचे होते.

या लग्नात सारा पूर्णपणे पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केली होती. त्यांच्या दागिन्यांपासून गजरे, साड्यांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मराठी शैली दिसून आली. ती पहिल्यांदाच साडीत दिसली होती.

लग्नाच्या इतर फंक्शन्समध्येही सारा व्हाइट शूटमध्ये दिसली. यादरम्यान तिची इतर नातेवाईकांशी भेट झाली. सारा तिच्या अभ्यासानिमित्त बराच काळ लंडनमध्ये राहत आहे. यादरम्यान ती अल्पावधीसाठीच भारतात आली आहे.

लग्नात सचिन तेंडुलकरही नवविवाहित जोडप्यासोबत दिसला. मुंबईतील जेडब्ल्यू हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले. छायाचित्रकार समीर वसईकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

या लग्नात सचिन खूप आनंदी दिसत होता. सर्व नातेवाईकांसोबत मस्ती केली. सचिनचे मस्ती करतानाचे फोटोही समोर आले आहेत.

लग्नात सचिनने वेगवेगळ्या विधींना हजेरी लावली आणि संपूर्ण लग्न मराठी रितीरिवाजानुसार पार पडले. लग्नात सचिन निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसला होता.

सारा तेंडुलकर हातात कलश घेऊन लग्नाचे विधी पार पाडताना दिसली. तिच्यासोबत इतर मुलीही कलश घेऊन तिच्यासोबत दिसत होत्या.