विमानतळावरील आपल्या अजब कारनाम्यामुळे व्हायरल होत आहे ही महिला


हवाई प्रवासादरम्यान होणारे अतिरिक्त सामान शुल्क वाचविण्यासाठी लोक काय करीत नाहीत. फिलिपिन्समधील रहिवासी असलेल्या एका महिला प्रवाश्याने अलीकडेच अतिरिक्त सामानाचे शुल्क भरावे लागू नये म्हणून एक अनोखी शक्कल लढवली. तिने आपल्या सूटकेसचे वजन कमी करण्यासाठी एकावर एक असे बरेच कपडे घातले, कारण तिला यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू नये.

जेल रॉड्रिग्जने 2 ऑक्टोबरला आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अशी माहिती दिली होती की एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी तिला सांगितले की तिचे सामान सात किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आहे. तिच्या सुटकेसचे वजन 9.5 किलोग्राम आहे, म्हणून तिला अतिरिक्त शुल्क भरावे भरावी लागेल, परंतु रॉड्रिग्जने अतिरिक्त सामान शुल्क भरण्यास नकार दिला. त्यानंतर तिने आपल्या सुटकेसमधून बरेच कपडे काढले आणि एकावर एक परिधान करत सर्व कपडे घातले आणि सामानाचे वजन कमी केले. रॉड्रिग्जने तिच्या फेसबुक पोस्टसह एक फोटो देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये ती पाच पॅन्ट्स आणि अनेक टी-शर्ट आणि जॅकेट परिधान केलेली दिसत आहे.

रॉड्रिग्जची पोस्ट 20 हजाराहून अधिक लोकांनी शेअर केली आहे. इतर माध्यमांच्या वृत्तानुसार रॉड्रिग्ज म्हणाले की, अतिरिक्त सामानाचे शुल्क मला द्यायचे नव्हते कारण ते फक्त दोन किलोग्राम जास्त होते. तिने विनोदपणे असेही सांगितले की, जर मला माहित असते की माझे फोटो एवढे व्हायरल होणार आहेत तर मी चांगली पोझ दिली असती. तथापि हे पहिले प्रकरण नाही. यावर्षी जुलैमध्येही अशीच एक घटना पाहायला मिळाली. अतिरिक्त सामानाच्या शुल्कासाठी बचत करण्यासाठी स्कॉटलंडच्या रहिवाशाने विमानतळावर 15 शर्ट घातले होते.

Leave a Comment