प्लास्टिकच्या ऐवजी याचा करा वापर, होईल तुमचे कौतूक

प्लास्टिक प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जागृकता देखील केली जात आहे. भारतात देखील सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी देखील आजही अनेक गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसत आहे. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, आज आपण वापरणारे प्लास्टिक नष्ट होण्यासाठी 300 ते 500 वर्ष लागतील.

प्लास्टिकला अनेक पर्याय शोधण्यात येत आहेत. प्लास्टिकला पर्याय म्हणून केळ्यांच्या पानांचा देखील वापर करता येऊ शकतो.

एका ट्विटर युजरने प्लास्टिकपासून बनवण्यात आलेल्या ताट-वाटींचा हा फोटो शेअर केला आहे. काही जण हा फोटो भारतातील आहे असे सांगत आहेत तर काहीजण थायलंडचा सांगत आहेत.

काही दिवसांपुर्वी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ अरूणाचल प्रदेशचा असून, यामध्ये दुकानदार केळीच्या पानांमध्ये मांस बांधून देत आहे.

केळींच्या पानांचा वापर हा खूप पुर्वीपासून केला जात आहे. औषधांसाठी देखील याचा वापर करण्यात येतो. केळींच्या पानांवर जेवण केल्याने घसा खवखवणे, खोकला, सर्दी, ताप असे आजार देखील यामुळे दूर होऊ शकतात. केळींच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल असते. हे एक प्रकारचे अँटीऑक्सीडेंट्स आहे. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

 

(Source)

केळींच्या पानांमध्ये जेवणाची चव देखील बदलते. पानांवर एक मोम सारखा नैसर्गिक थर असतो. याची चव खूप वेगळी असते. गरम जेवण पानांवर दिल्यावर हे मोम विरघून जेवणात मिसळते. त्यामुळे जेवणाची चव अधिक चांगली लागते.

केरळमधील घरांमध्ये आजही जेवणासाठी केळींच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे प्लास्टिकपासून सुटका करण्यासाठी या पानांचा वापर करण्यास काहीही हरकत नाही.

 

Leave a Comment