हा हुकुमशहा हात धुण्यासाठी करायचा दारुचा वापर

जगभरात आजपर्यंत अनेक हुकुमशहा होऊन गेले. त्यांच्या क्रुरतेमुळे, विचारधारेमुळे त्यांची नावे आजही इतिहासात नमूद आहेत. असाच एक हुकुमशहा म्हणजे निकोलय चाचेस्कू. चाचेस्कूने सलग 25 वर्ष रोमानियावर राज्य केले. त्याच्या भितीने लोक आणि मीडिया देखील काहीच बोलत नसे. चाचेस्कूने स्वतःचा इतिहास तर बनवला, मात्र आज रोमानियामध्ये त्याचा इतिहास आज कोणालाच आवडत नाही.

जगभरात अनेक हुकुमशहा होऊन गेले. मात्र निकोलस चाचेस्कू सर्वांपेक्षा वेगळा होता. सांगण्यात येते की, 60-70 च्या दशकात चाचेस्कूने सर्वसामान्य लोकांवर देखील देखरेख ठेवण्यासाठी गुप्त पोलिसांची नेमणूक केली होती. हे सर्वसामान्य लोक आपल्या खाजगी आयुष्यात काय करतात, हे जाणून घेणे या मागचा उद्देश होता.

(Source)

चाचेस्कूच्या मृत्यूनंतर देखील 10 वर्ष तेथील नागरिक त्याच्या भितीने घाबरत असे. रोमानियामध्ये चाचेस्कूला ‘कंडूकेडर’ नावाने ओळखले जाते. याचा अर्थ ‘नेता’ असा होतो. तर चाचेस्कूच्या पत्नी एलीनाला रोमानियाची ‘राष्ट्रमाता’ असा किताब देण्यात आला होता. हुकुमशाही एवढी होती की, फुटबॉल सामन्यात कोण विजेता होणार आणि सामना टिव्हीवर प्रक्षेपित केला जाणार की नाही, हे देखील एलीना ठरवत असे.

(Source)

चाचेस्कूने संपुर्ण देशात गर्भपातावर बंदी घातली होती. रोमानियाची लोकसंख्या वाढवणे हे चाचेस्कूचा उद्देष होता. जेणेकरून रोमानिया एक शक्तीशाली राष्ट्र ठरेल. याशिवाय घटस्फोटासाठी देखील असे नियम होते की, लोक घटस्फोट देखील घेऊ शकत नसे.

(Source)

चाचेस्कूबद्दल असे ही सांगितले जाते की, त्याला साफ-सफाईचा असा आजार होता की, तो एका दिवसात 20 वेळा दारूने हात धुवत असे. ही हात धुण्याची सवय ऐवढी होती की, 1979 मध्ये ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांच्याशी भेट घेतल्यानंतर देखील त्याने दारूने आपले हात धुवले होते. एवढेच नाही तर त्याच्या बाथरूममध्ये देखील हात धुण्यासाठी दारूची बॉटल ठेवण्यात आली होती.

(Source)

चाचेस्कूची हुकुमशाही एवढी वाढली होती की, रोमानियाच्या लोकांना जेवण देखील मिळत नसे. मात्र फळे-भाज्या, मांसची दुसऱ्या देशात निर्यात होत असे. अखेर लोकांनी चाचेस्कूच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवला. यामुळे 25 डिसेंबर 1989 मध्ये त्याला व त्याची पत्नी एलीनाला अटक करण्यात आले. न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली व दोघांनाही गोळ्या झाडून त्यांची हुकुमशाही संपवण्यात आली.

Leave a Comment