पिकांची वाढ होण्यासाठी या शेतकऱ्यांनी वापरली अनोखी पध्दत

चीनच्या गुआंक्सी प्रांतामधील नानिंग शहरात ड्रॅगन फ्रुटच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखी पध्दत शोधली आहे. थंडीच्या दिवसात ढग असल्याने सुर्यप्रकाश पिकांना मिळत नसे. त्यामुळे पिकांना एलईडी बल्ब लावून प्रकाश दिला जात आहे. जेणेकरून पिकांची वाढ होईल.

पिन ली फार्मचे प्रमुख झी शू यांनी सांगितले की, तापमान कमी झाल्याने पिकांना योग्य प्रमाणात ऊन मिळत नव्हते. यामुळे पिकांवर परिणाम होत होता. यासाठी येथील शेतकऱ्यांनी पिकांना प्रकाश देण्यासाठी एक लाखांपेक्षा अधिक पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे एलईडी बल्ब शेतात लावले. हे बल्ब दिवसरात्र सुरू असतात.

येथील शेतकरी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन करतात. याचे पिक 150 एकरात पसरलेले आहे. बल्बच्या उजेडांमुळे पिकांची वाढ होत आहे. थंडीमध्ये मुबलक सुर्यप्रकाश मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बल्बद्वारे पिकांना प्रकाश देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची ही हटके पध्दत फायदेशीर ठरत आहे.

 

Leave a Comment