दंतकथा म्हणजे ज्यांवर विश्वास ठेवता येणार नाही अशा काही आख्यायिका किंवा खोट्या गोष्टी. आपण ज्या दंतकथा पाहणार आहोत त्या दातांच्या संबंधात आहेत म्हणून तर त्यांना दंतकथा म्हणणार आहोतच पण त्या गोष्टी खर्या नाहीत म्हणूनही त्यांना दंतकथा म्हणत आहोत. दातांविषयी अनेक समज आणि गैर समज आहेत. ते कमी करण्यासाठी या दंतकथांच्या संबंधात स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. आपण ग्रामीण भागातून फिरायला लागलो की लोकांना आरोग्याच्या सवयी लागाव्यात म्हणून भिंतींवर अनेक घोषणा लिहिलेल्या असतात. त्यातली एक घोषणा म्हणजे, जेवणापूर्वी हात धुवा आणि जेवणानंतर दात धुवा. या घोषणेमुळे काही लोक जेवणापूर्वी आता हात धुवायला लागले आहेत आणि फार कमी लोक जेवण होताच हातात ब्रश घेऊन दात घासायला लागले आहेत.
काही दंतकथा…….
खरे तर जेवण झाल्याबरोबर दात घासणे हे योग्य नाही कारण जेवण झाल्याबरोबर आपल्या दातात काही प्रक्रिया सुरू असतात. खाल्लेले अन्न पचन व्हावे यासाठी दातांवर काही आम्ले स्रवत असतात. जेवण झाल्याबरोबर आपण हाता ब्रश घ्यायला लागलो तर हे आम्ल म्हणजे ऍसिड धुतले जाते आणि ते धुतले गेल्याने दातावरचे संरक्षक कवच म्हणजे एनॅमलही नष्ट होते. परिणामी दातांचे संरक्षण होत नाही. दुसरी दंत कथा आहे ती दात घासण्याबाबत. दात घासणे म्हणजे दातांवरून ब्रश फिरवणे. तो कसाही फिरवून चालत नाही. विशिष्ट पद्धतीनेच फिरवला पाहिजे पण केवळ ब्रश फिरवून दात स्वच्छ होतातच असे नाही तर दोन दातांच्या मध्ये असलेल्या फटीतले अन्नकण काढून टाकले पाहिजेत. त्यासाठी फ्लॉसिंग करावे लागते.
दातांविषयी आणखी एक गोष्ट म्हणजे दातांच्या स्वच्छतेसाठी वापरला जाणारा ब्रश. तो आपण किती दिवस वापरतो ? काही काही लोक ब्रशांचा वापर काही वर्षेही करतात. ब्रशांचे केस पूर्णपणे मोडून खाली बसेपर्यंत ते तोच ब्रश वापरतात. पण ब्रश हा दर महिन्याला बदलला पाहिजे कारण महिनाभरात ब्रशाचे केस खराब होत असतातच पण फार दिवस वापरल्या जाणार्या ब्रशात अनेक प्रकारचे रोगजंतू बसलेले असतात. त्यांच्यासाठी का होईना पण दाताचा ब्रश काही दिवस वापरून फेकून दिला पाहिजे. शिवाय ब्रश हा मऊ केसांचा असला पाहिजे. फार कडक ब्रश हा दातांना आणि हिरड्यांना हानी पोचवत असतो. अशा अनेक दंतकथा लोकांना समजून टाकल्या पाहिजेत आणि त्यांच्या दातांचे रक्षण केले पाहिजे.