एका अवलियाने चक्क दगडांपासून बनवली बीएमडब्ल्यू


आज मितीस जगात काय घडेल याचा काही नेम नाही. एखाद्याने काही नाविन्यपूर्ण असे काही केले तर सर्वांनाच आश्चर्यचा धक्का तर नक्कीच बसतो. हे देखील तेवढेच खरे आहे. पण चीनमधील एका अवलियाने आलिशान कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूला तोंडात बोटे घालायची वेळ आणली आहे.

चीनमधील या अवलियाने चक्क चक्क दगडांपासून बीएमडब्ल्यू झेड ४ ही स्पोर्ट कार बनवली आहे. ही कार पाहून या कारची निर्मीती करणाऱ्या बीएमडब्ल्यूला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बीएमडब्ल्यू झेड४ या स्पोर्ट कारचे हे एक मॉडेल असून ही कार लोखंड, लाकूड, प्लास्टीक किंवा इतर धातूंपासून नव्हे तर, चक्क दगडांपासून बनविण्यात आली आहे. चीनच्या जियाग्सू प्रांतात काही दिवसांपूर्वीच या बीएमडब्ल्यू कारचे प्रदर्शन भरवरण्यात आले. दगडांपासून बनविण्यात आलेल्या या कारचे वजन सुमारे ६.५ टन इतके आहे. डाई गेंग यांनी या कारचे डिजाईन केले असून, केवळ दगडांपासून बणविण्यात आलेली ही कार, ताशी १५० मैल या वेगाने धावू शकते.

ही गाडी बनविणाऱ्या कलाकारांची महानता यातच दिसून येते की, या कारची निर्मिती करताना केवळ दगडांचा वापर करण्यात आला आहे. ही कार विक्रीसाठीही उपलब्ध असून, कारची निर्मिती करणाऱ्या डाई गेंग यांनी ८०००० पौंड ऐवढी या कारची किंमत सांगितली आहे.

दगडांपासून बनलेली ही कार ५ मिटर लांब तर, २.५ मीटर रूंद आहे. १.६ मीटर उंची असलेली ही कार २००७मध्येच तयार करण्यात आली होती. कारचे टायर, स्टेअरिंग, एक्जडहोस्ट पाईप सर्व वस्तू दगडांपासूनच बनविण्यात आल्या आहेत. ही कार खरेदी करण्यासाठी अद्याप तरी कोणी पूढे आल्याची माहिती नाही. मात्र, ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात प्रचेड यशस्वी झाली आहे.

Leave a Comment