शिमरॉन हेटमायरच्या पत्नीवर टिप्पणी केल्याने सुनील गावस्कर अडचणीत


कॅरेबियन फलंदाज शिमरॉन हेटमायर अलीकडेच इंडियन प्रीमियर लीगमधून विश्रांती घेऊन मायदेशी परतला होता. त्याची पत्नी गरोदर होती आणि प्रसूतीनंतर तो पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने भाग घेतला होता. जेव्हा तो बॅटींगला उतरला तेव्हा समालोचन करताना सुनील गावसकर यांनी एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे लोक संतापले. क्रिकेट चाहते आता महान क्रिकेटरला ट्रोल करत आहेत आणि त्यांना कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणी देखील करत आहेत.

वास्तविक, हेटमायर मैदानात आला, तेव्हा राजस्थान रॉयल्सला विजयासाठी महत्त्वाच्या धावा करायच्या होत्या. त्यावेळी गावसकर म्हणाले- शिमरॉन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे, ती राजस्थान रॉयल्ससाठी प्रसूती (रन्स) करेल का?

यावरुन लोक त्यांना ट्रोल करत आहेत. काही लोकांनी त्यांना कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणीही केली होती. दरम्यान हेटमायर 7 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. दुसरीकडे, आर. अश्विनने 23 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 40 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय तर मिळवून दिलाच शिवाय त्यांना प्लेऑफचे तिकीटही मिळवून दिले.