ट्रायच्या प्रयत्नांना यश आल्यास, आता तुम्हाला ट्रूकॉलरशिवायही कॉल करणाऱ्याचे नाव कळू शकेल. खरं तर, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Trai) लवकरच KYC आधारित नाव प्रदर्शनाची पद्धत सुरू करण्याची योजना आखत आहे. यासंदर्भात काही महिन्यांत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाशी (डॉट) चर्चा सुरू आहे. ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी सांगितले की, आम्हाला यासंबंधी काही संदर्भ मिळाले असून त्यावर लवकरच काम सुरू केले जाईल.
आता तुम्ही ट्रू कॉलरशिवायही ओळखू शकाल कॉलर, ट्राय आणू शकते केवायसी आधारित पद्धत
ट्राय आधीच याबद्दल करत आहे विचार
वाघेला म्हणाले की ट्राय आधीच यावर विचार करत आहे, परंतु आता या प्रकरणी दूरसंचार विभागाकडून माहिती मिळाली आहे. या पद्धतीद्वारे कॉलरचे नाव तुमच्या फोन स्क्रीनवर लगेच दिसेल. वास्तविक, भारतात अशी सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांचा डेटा त्यांच्याकडे जाण्याचा धोका आहे.
अॅपमधील डेटा चोरीला बसेल आळा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन केवायसी-आधारित प्रणालीसाठी फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर, कॉलरची ओळख अधिक स्पष्ट आणि कायदेशीररित्या वैध होईल. सर्व अॅप्सवरील डेटा नष्ट होईल आणि केवायसीशी संबंधित डेटा राहील याचाही फायदा होईल. मात्र, ही सुविधा ऐच्छिक असेल की अनिवार्य असेल, हे स्पष्ट झालेले नाही.