नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली. नवीन किंमत लागू झाल्यानंतर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी 78.17 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
CNG Price Hike: सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजपासून कितीला मिळणार गॅस ?
त्याच वेळी, दिल्लीमध्ये नवीन किंमत आता 75.61 रुपये प्रति किलो झाली आहे, तर गुरुग्राममध्येही सीएनजी 83.94 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. वाढलेल्या किमती 21 मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाल्या आहेत.
मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजीची किंमत 82.84 रुपये प्रति किलो झाली असून रेवाडीमध्ये ग्राहकांना 86.07 रुपये मोजावे लागणार आहेत. कर्नाल आणि कैथलमध्ये सीएनजी 84.27 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये ग्राहकांना 1 किलो सीएनजीसाठी 84.70 रुपये मोजावे लागतील आणि अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 1 किलो सीएनजीची किंमत 85.88 रुपये प्रति किलो झाली आहे.