नवी दिल्ली – भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानानंद रमेशप्रभू याने 2022 मध्ये विश्वविजेता मॅग्नस कार्लसनवर दुसरा विजय नोंदवला आहे. नॉर्वेच्या कार्लसनने चेसबॉल मास्टर्सच्या पाचव्या फेरीत मोठी चूक केली आणि प्रज्ञानानंदने त्याचा फायदा घेत मुसंडी मारली. या विजयासह प्रज्ञानानंदच्या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. तीन महिन्यांत प्रज्ञानानंदने कार्लसनचा पराभव करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात त्याने एअरथिंग्ज मास्टर्समध्ये जगज्जेत्या कार्लसनचा पराभव केला होता. कार्लसनवरचा हा पहिला विजय होता. आता तीन महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
16 वर्षीय प्रज्ञानानंदने तीन महिन्यांत दुसऱ्यांदा केला विश्वविजेत्याचा पराभव, एका चुकीमुळे सामना हरला कार्लसन
या स्पर्धेच्या पाचव्या फेरीत प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यात 150 हजार यूएस डॉलर (1.16 कोटी रुपये) बक्षीस रक्कम आहे. सामना अनिर्णितेच्या दिशेने जात होता, पण 40व्या चालीत कार्लसनने मोठी चूक केली. त्याने आपला काळा घोडा चुकीच्या जागी ठेवला. यानंतर भारतीय खेळाडूने त्याला परतण्याची संधी दिली नाही आणि अचानक त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. कार्लसनच्या चुकीमुळे सामना जिंकल्यानंतर प्रज्ञानंदने सांगितले की, मला अशा पद्धतीने सामना जिंकायचा नाही.