नवी दिल्ली – आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी लवकरच एक मोठा करार करणार आहेत. एका अहवालानुसार, रिलायन्स या महिन्याच्या अखेरीस यूके-आधारित मेडिकल रिटेल चेन ‘बूट्स यूके’साठी बोली लावण्याची तयारी करत आहे. हा करार 10 अब्ज डॉलरचा असू शकतो आणि यासाठी अंबानींनी अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट इंकसोबत भागीदारी केली आहे.
मुकेश अंबानी करणार 10 अब्ज डॉलर्सचा मोठा सौदा, ब्रिटनच्या या बड्या कंपनीवर नजर
हा करार पूर्ण झाल्यास मुकेश अंबानी यांचा देशाबाहेरील हा सर्वात मोठा करार असेल, असे अहवालात म्हटले आहे. बूट्स यूकेसाठी बोली लावण्याची अंतिम मुदत देखील वाढवण्यात आली आहे, असे अहवालात म्हटले आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी व्यतिरिक्त, ब्रिटीश अब्जाधीश इसा ब्रदर्ससह इतर दिग्गज या कंपनीच्या अधिग्रहणात रस दाखवत आहेत.
वृत्तानुसार, मुकेश अंबानी या डीलबाबत खूप गंभीर असून निधी उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्सचे युरोपियन रिटेल मार्केटमध्ये मजबूत अस्तित्व असेल. याशिवाय, रिलायन्सने विकत घेतलेले नेटमेड्स देशाबाहेर लाँच करण्यासही हा करार मदत करेल.