दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत 100% प्रेक्षकांना परवानगी, 9 जूनपासून सुरू होणार मालिका


नवी दिल्ली : बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील बंदी उठवली आहे. आता स्टेडियमच्या क्षमतेनुसार 100 टक्के प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामन्याचा आनंद घेता येणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घातली होती. 2020 मध्ये कोरोना महामारीचे आगमन झाल्यापासून प्रत्येक मालिकेत प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे नियम करण्यात आले होते.

अनेक सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या येण्यावर पूर्ण बंदी होती. यानंतर स्टेडियमच्या क्षमतेनुसार 50 किंवा 75 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली. आता प्रेक्षकांच्या येण्यावरचे निर्बंध पूर्णपणे हटले आहेत. या प्रकरणी बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत प्रेक्षकांना मैदानावर जाऊन टी-20 सामन्याचा आनंद घेता येणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.