Visa corruption case: कार्ती चिदंबरमचे निकटवर्तीय रमणला अटक, व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयची कारवाई


नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांचा जवळचा सहकारी एम. भास्कर रमण याला अटक केली आहे. व्हिसा भ्रष्टाचार प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, सीबीआयच्या पथकाने रात्री उशिरा चौकशीनंतर रमणला अटक केली आहे. याआधी मंगळवारी सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण 50 लाखांची लाच घेऊन 263 चिनी नागरिकांचा व्हिसा मिळवण्याशी संबंधित आहे.

लाच घेऊन चिनी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळवून दिल्याप्रकरणी सीबीआयने काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर सीबीआयने मंगळवारी सकाळी कार्तीच्या चेन्नई आणि दिल्लीतील निवासस्थानासह देशभरातील 10 ठिकाणी छापे टाकले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वडील पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना कार्ती यांनी 50 लाख रुपयांची लाच घेऊन 263 चिनी नागरिकांना व्हिसा दिला होता.

सीबीआय अधिकाऱ्यांनी मंगळवारी काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, कोप्पल (कर्नाटक), झारसुगुडा (ओडिशा), मानसा (पंजाब) आणि दिल्ली येथे छापे टाकले. कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आयएनएक्स मीडिया प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. यासह नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कार्तीने तलवंडी साबो वीज प्रकल्पासाठी चिनी नागरिकांना व्हिसा दिला होता.

कार्ती व्यतिरिक्त, सीबीआयने कार्ती, त्याचा जवळचा सहकारी एस भास्कर रमण, तलवंडी साबो वीज प्रकल्प प्रतिनिधी विकास मखरिया (ज्याने लाच दिली), कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड, मुंबईस्थित बेल टूल्स लिमिटेड (ज्यामार्फत लाच दिली गेली) यांनाही अटक केली आहे. आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांवर गुन्हेगारी कट, खात्यांमध्ये फेरफार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. प्राथमिक तपासात सीबीआयला भास्कर रमणकडून 50 लाखांच्या व्यवहारांची माहिती असलेली हार्ड ड्राइव्ह सापडली होती.

सीबीआयच्या छाप्यांनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले होते, माहित नाही किती वेळा, मी मोजायला विसरलो. ‘रेकॉर्ड’ झालाच असेल! काही वेळाने कार्तीने आणखी एक ट्विट केले. माझ्या कार्यालयातून ‘रेकॉर्ड’ची माहिती नुकतीच मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. 2015 मध्ये दोनदा, 2017 मध्ये एकदा, 2018 मध्ये दोनदा आणि आज. एकूण 6 वेळा! यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी ट्विट केले की, सीबीआयच्या टीमने माझ्या चेन्नई आणि दिल्लीतील निवासस्थानी छापे टाकले आहेत. टीमने मला एक एफआयआर दाखवला ज्यामध्ये मला आरोपी बनवण्यात आलेले नाही.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्विट केले की, सीबीआयच्या पथकाला आमच्या घरातून काहीही मिळाले नाही, किंवा हे लोक काहीही हस्तगत करू शकले नाहीत. पण एवढे करूनही सीबीआयच्या छाप्यांचा काळ रंजक होता. मात्र, काँग्रेस नेते कोणत्या वेळेबाबत बोलत आहेत, याचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आलेला नाही.

तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पंजाबमधील आमच्या ठिकाणांवर छापे टाकणे हा सीबीआयच्या तपासाचा मुख्य भाग आहे. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.