नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र, अनिल बैजल यांनी याबाबत वैयक्तिक कारणे सांगितली आहेत.
Anil Baijal Resigns: एलजी अनिल बैजल यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिला राजीनामा
माजी आयएएस अधिकारी बैजल यांची 31 डिसेंबर 2016 रोजी लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दिल्लीतील उपराज्यपाल बैजल आणि आम आदमी पार्टी (आप) सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून नेहमीच वाद होत आहेत. या वर्षीही कोरोनाच्या चौथ्या लाटेत दिल्ली सरकार आणि एलजी यांच्यात सम-विषम नियमावर एकमत झाले नाही. यादरम्यान एलजी अनिल बैजल यांनी केजरीवाल सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला होता.