CBI Raid: कार्ती चिदंबरम पुन्हा CBIच्या रडारवर, 50 लाखांची लाच घेऊन 250 चिनी नागरिकांचा व्हिसा बनवल्याचा आरोप


माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्यावर सीबीआयने पुन्हा एकदा छापा मारली आहे. यावेळी त्यांच्यावर 250 चिनी नागरिकांकडून 50 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सीबीआयने सांगितले. कार्तीने 50 लाखांची लाच घेऊन 250 चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.

नऊ ठिकाणी छापे टाकले
संबंधित प्रकरणात सीबीआयच्या पथकाने कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली आणि चेन्नईसह देशातील नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये चेन्नईतील तीन, मुंबईत तीन आणि कर्नाटक, पंजाब आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एका ठिकाणी शोध घेण्यात येत आहे. या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, असे किती वेळा झाले, मी मोजणी विसरलो आहे. त्यांनी पुढे लिहिले की, हा छापा नोंदवला गेला पाहिजे.

यूपीए सरकारच्या काळात घेतली गेली लाच
यूपीए सरकारच्या काळात, कार्ती चिदंबरम यांनी एका वीज प्रकल्पासाठी 250 चिनी नागरिकांना व्हिसाची सुविधा देण्यासाठी 50 लाख रुपयांची कथित लाच घेतली होती, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयला INX मीडिया प्रकरणाशी संबंधित त्याच्या चालू तपासादरम्यान या प्रकरणाची माहिती मिळाली, ज्यामध्ये INX मीडियासाठी विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (FIPB) ची मंजुरी मिळवण्यासाठी कार्तीची आधीच चौकशी सुरू आहे.