Paytm, PhonePe आणि Google Pay वरून तुम्ही सहज शोधू शकता तुमचा UPI ID


सध्याच्या घडीला युपीआय हे एक असे माध्यम बनले आहे ज्याच्या माध्यातून देशभरात कुठेही झटपट पैसे ट्रान्सफर करता येतात. देशातील 150 दशलक्षाहून नागरिक युपीआय वापरतात. युपीआयच्या मदतीने वापरकर्ते फक्त त्यांचा युपीआय आयडी वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. यामुळे त्यांना बँक अकाउंट नंबर किंवा इतर कोणतेही तपशील शेअर करण्याची गरज नाही. इंटिग्रेटेड केलेल्या पेमेंट अ‍ॅपमध्ये युपीआय आयडी भीम युपीआय सह तयार करणे आवश्यक आहे. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारखे अनेक डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात. या अ‍ॅप्समध्ये युनिक युपीआय आयडी किंवा व्हर्च्युअल पेमेंट अँड्रेस (व्हीपीए) आहे, जे पैसे पाठवण्यासाठी आवश्यक आहे.

पण या दरम्यान तुम्हाला जर तुमचा युपीआय आयडी लक्षात नसेल, तर तुमची पंचाईत होऊ शकते. पण आता काळजी करु नका कारण आम्ही तुम्हाला आज गुगल पे, पेटीएम किंवा फोनपे यांच्या मदतीने तुमचा आयडी कसा शकता, याची माहिती देणार आहोत.

फोन पेवरील तुमचा युपीआय आयडी कसा शोधाल?

युपीआय व्यवहारांसाठी फोनपे हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फोनपेवर युपीआय आयडी शोधणे खूप सोपे आहे.

  • त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवरील फोनपे अ‍ॅप उघडावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला फोनपे अॅपच्या स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल पिक्चर असलेल्या ठिकाणी टॅप करावे लागेल.
  • आता युपीआय सेटिंग्जवर क्लिक करावे लागले.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित युपीआयआयडी तुमच्या नजरेस पडेल.

पेटीएम अ‍ॅपमध्ये कसा शोधाल युपीआय आयडी ?

  • सर्वआधी तुमच्या मोबाईलमधील पेटीएम अ‍ॅप उघडा.
  • आता पेटीएम अॅपच्या स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या क्यूआर कोडच्यावर तुमचा युपीआय आयडी दिसेल.

कसा शोधाल गुगलपेमध्ये युपीआय आयडी ?

  • सर्व प्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगलपे अ‍ॅप उघडा
  • आता गुगलपे अ‍ॅपच्या वरील बाजुच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा युपीआय आयडी जाणून घेण्यासाठी बँक खाते निवडावे लागेल.
  • तुम्हाला ‘युपीआय आयडी’ सेक्शनमध्ये तुमचा आयडी दिसेल.