Google Pay च्या नव्या फीचरमुळे अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट


पाईन लॅबच्या सहकार्याने गुगल पेने एक फीचर लाँच केले आहे, युपीआयसाठी जे टॅप टू पे पद्धत वापरण्यास परवानगी देईल. आतापर्यंत, फक्त कार्डसाठी टॅप टू पे फिचर उपलब्ध होते. सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. पण ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी यापुढे अ‍ॅप उघडण्याची गरज नाही. फोनला कोणत्याही मशिनने फक्त टच केल्यामुळे काही सेकंदात पेमेंट केले जाईल. असेच एक फिचर पाईन लॅबच्या सहकार्याने गुगल पेने सादर केले आहे.

रिलायन्स रिटेलसह ही सुविधा सुरू करण्यात आली आहे आणि आता ती फ्युचर रिटेल, स्टारबक्स आणि इतर व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असेल. नवीन फीचर चांगल्या प्रकारे समजून येण्यासाठी गुगलने वापरकर्त्यांसाठी एक हेल्प पेज देखील लॉंच केले आहे. तुम्हाला जर युपीआय पेमेंटसाठी टॅप टू पे फीचर वापरायचे असेल, तर तुमच्या अ‍ॅड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एनएफसी सुविधा आहे का ते आधी तपासावे लागेल. ते तपासण्यासाठी, तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्व प्रथम, अ‍ॅड्रॉइड फोनमधील सेटिंग्ज ऑप्शन उघडा.
  • बहुतेक अ‍ॅड्रॉइड फोनमध्ये कनेक्शन सेटिंग्जमध्ये एनएफसी फिचर असते. हे फीचर उपलब्ध असल्यास एनएफसी आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • ते एनएफसी असल्यास, ते सर्च परिणामांमध्ये दिसेल. तुम्ही तिथून ते फीचर अ‍ॅक्टिव्ह करू शकता.

कसे पाठवाल गुगलपेने पैसे?

  • सर्व प्रथम तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करावा लागेल. त्यानंतर पेमेंट टर्मिनलवर फोन टॅप करावे लागेल
  • त्यानंतर गुगल पे आपोआप कार्यान्वित होईल.
  • द्यावयाच्या पैशांची पुष्टी करा आणि पुढे जा वर टॅप करा.
  • त्यानंतर तुम्हाला पैसे हस्तांतरित झाल्याची माहिती दिसेल.