गगनयानची तयारी: इस्रोने घेतली HS200 रॉकेट बूस्टरची यशस्वी चाचणी, या मोहिमेत होऊ शकते मदत


नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संस्था ISRO ने शुक्रवारी (13 मे) सकाळी मानवी रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर (HS200) ची यशस्वी चाचणी घेतली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 7.20 वाजता रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट गगनयान कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले आहे.

इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मते, HS200 रॉकेट बूस्टर ही GLSV Mk3 सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलच्या S200 रॉकेट बूस्टरची मानव-रेट केलेली आवृत्ती आहे. प्रक्षेपण यानाच्या पहिल्या टप्प्यात ही चाचणी घेण्यात आली, जी गगनयान कार्यक्रमातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.