कोलंबो – युनायटेड नॅशनल पार्टीचे (UNP) नेते रानिल विक्रमसिंघे हे आर्थिक आणि राजकीय संकटातून जात असलेल्या श्रीलंकेचे नवे पंतप्रधान असतील. ते आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाने याला दुजोरा दिला आहे. त्यांनी यापूर्वी पंतप्रधानपद भूषवले आहे. 2019 मध्ये, रानिल यांनी स्वतःच्या पक्षाच्या दबावामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
1 खासदार असलेल्या पक्षाचे रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान
कोण आहेत रानिल विक्रमसिंघे?
- श्रीलंकेच्या नवीन ‘एकता सरकार’मध्ये रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान असतील.
- रानिल (73) युनायटेड नॅशनल पार्टी (UNP) चे प्रमुख आणि संसदेत त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत.
- 1977 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. ते २ वेळा विरोधी पक्षनेते होते.
- 225 सदस्य असलेल्या श्रीलंकेच्या संसदेत उर्वरित विरोधी पक्ष रानिल यांना पाठिंबा देत आहेत.
- रानिल 1993 ते 2019 दरम्यान चार वेळा पंतप्रधान राहिले आहेत.
- ते देशाचे सर्वोत्तम राजकीय प्रशासक आणि अमेरिकन समर्थक मानले जातात.