गोष्ट कामाची : आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला काही मिनिटांत मिळू शकते कर्ज, त्यासाठी फॉलो करावी लागेल फक्त ही सोपी प्रक्रिया


आजच्या काळात जर कोणते कागदपत्र आवश्यक असेल तर ते बहुधा आधार कार्ड आहे. त्यामागील कारण म्हणजे बहुतांश ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार त्याला जवळपास सर्वच कामांची जोडही देण्यात आली आहे. बँकेशी संबंधित काम, गॅस कनेक्शन, सबसिडी, सिमकार्ड, नोकरीसाठी कागदपत्रे देणे, अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कर्ज देखील घेऊ शकता. होय, तुम्ही एक सोपी प्रक्रिया करून कर्ज घेऊ शकता. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर ते कर्ज घेण्यासाठी देखील आवश्यक आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कर्ज कसे घेऊ शकता.

आधारच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया फॉलो करू शकता:-

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Play Store वरून बँकेचे अॅप डाउनलोड करावे लागेल, ज्याच्याकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे. आता येथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करावे लागेल.

यानंतर, येथे कर्जाचा पर्याय निवडा आणि येथे विचारलेली आवश्यक माहिती भरा जसे- तुमचे पूर्ण नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक इ.

यानंतर, तुम्हाला तुमची आधार माहिती विचारली जाते. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे तुम्हाला त्याची पडताळणी करावी लागेल.

आधार कार्डची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला कर्जाची पात्रता कळते आणि मंजुरी मिळाल्यानंतर, काही काळानंतर तुम्हाला कर्ज दिले जाते.