जॅक डोर्सीकडून एलन मस्कचे समर्थन, म्हणाले – ट्विटरवर झाली पाहिजे डोनाल्ड ट्रम्प यांची वापसी


ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुनर्संचयित करावे, या एलन मस्क यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना गुगलपासून ट्विटर आणि फेसबुक-इन्स्टाग्रामवर ब्लॉक करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी घालणे हा चुकीचा निर्णय असल्याचे जॅक डोर्सी यांनी म्हटले आहे.

जॅक डॉर्सी म्हणाले, मी सहमत आहे की काहीवेळा वापरकर्त्यांना स्पॅम किंवा धोरणाविरुद्ध ट्विटसाठी प्रतिबंधित केले जाते, परंतु खाते कायमचे ब्लॉक करणे, हे आमचे अपयश आहे. डोर्सी यांनी 14 जानेवारी 2021 रोजी एक ट्विट देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातल्यानंतर आम्हाला काही आनंद झालेला नाही.

एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यावरील बंदीबाबत हा नैतिकदृष्ट्या वाईट निर्णय असल्याचे म्हटले आहे. एलन मस्क यांचा असा विश्वास आहे की खात्यावर कायमस्वरूपी बंदी घातल्याने लोकांचा ट्विटरवरील विश्वास कमी होतो. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी घालणे योग्य नव्हते, ती चूकही असू शकते.

ट्विटरने मस्क यांच्या टीकेला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही आणि ट्रम्पच्या प्रवक्त्याकडून त्वरित कोणतीही टिप्पणी आली नाही. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांचे ट्विटर खाते निलंबित करण्यात आले होते, त्यांचे 88 दशलक्ष (8.8 कोटी) फॉलोअर्स होते.