NIA चा डी कंपनी विरोधात सर्वात मोठा छापा, दाऊद गँग आणि हवाला ऑपरेटर्सच्या 20 ठिकाणी छापे


मुंबई : महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. ताजे प्रकरण एनआयएच्या छाप्याशी संबंधित आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, एनआयएचे पथक मुंबई आणि महाराष्ट्रात 20 ठिकाणी छापे टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे अनेक साथीदार, शार्प शूटर आणि हवाला ऑपरेटर यांच्यावर हा छापा टाकला जात आहे. मुंबईतील नागपाडा, गोरेगांव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी भागात छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. या छाप्यात अनेक हवाला ऑपरेटर, ड्रग्ज तस्कर यांच्यासह डी-गँगशी जवळचे संबंध असलेल्या अशा अनेक लोकांवर छापे टाकण्यात येत आहेत. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनआयएचे छापे हे त्या संदर्भात असल्याचे बोलले जात आहेत.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीच्या सदस्यांशी संबंध आणि टेरर फंडिंग असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. महाराष्ट्रातील आणखी एक मंत्री अनिल परब यांना लवकर अटक करण्याचा दावा भाजप नेते करत आहेत. तर एनआयएच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे लागली आहेत.